Share

“१५ तारखेला शिवसेनेची पत्रकार परिषद होणार, त्यापूर्वी..”, संजय राऊतांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी १५ तारखेला शिवसेनेची पत्रकार परिषद होणार असून त्यापूर्वी कुणाला किती आणि काय फाईली दाखवायच्या असतील, त्या दाखवाव्यात. असा इशारा दिला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी कालच (१२ फेब्रुवारी) संजय राऊत एकाकी पडले असून, त्यांच्यावरील आरोपांनंतर शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारमधील एकही नेता बोलायला तयार नसल्याचे म्हटले होते. त्यात आज संजय राऊत यांनी १५ तारखेला (Shiv Sena press conference to be held on 15 February)  शिवसेना आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकरची पत्रकार परिषद होणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत वादात सापडत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधील कोविड घोटाळा, तसेच वाईनसंबंधी आरोप लावले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी सोमाय्यांवर पुणे महापालिकेतही शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली होती. याचा आरोपही संजय राऊतांवर लावला गेला. त्यात संजय राऊतांनी उपराष्ट्रपती यांना पत्र लिहून खळबळ माजवली होती. आता त्यांनी १५ तारखेला शिवसेनेची ४ वाजता पत्रकार परिषद होणार असलायचे म्हटले आहे. यामध्येही ते काही मोठा खुलासा करतील, की सोमय्या यांनी लावलेल्या आरोपांबाबत काही खुलासा करतील याबाबत उत्सुकता लागली आहे.

दरम्यान आमच्यावर आरोप करणारे जे फाईल घेऊन फिरत आहेत, त्यांनी यूपीतील गंगा नदीत जेव्हा प्रेते वाहत होती, त्यांच्यावर एफआयआर दाखल करावीत. त्यामुळे तुमच्याही फाईली तयार आहेत. तेव्हा कळते फाईलमध्ये काय असते. कोरोना काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे जगभरात कौतुक झाले आहे. हेच तुमच्या पोटात दुखते, असे असेल तर पोटावर उपचार करू.असा इशाराही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!