Share

IPL AUCTION 2022: आता रहाणे बनवणार नाईट रायडर्सना ‘अजिंक्य’

Published On: 

बंगळुरू : राजस्थान आणि दिल्कलीडून अनेक वर्ष खेळल्यानंतर अजिंक्य रहाणे आता किंग खानसोबत खेळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्यला त्याच्या बेस प्राईस १ कोटींमध्ये खरेदी केले आहे.

आयपीएल मेगा ऑक्शनआधी अजिंक्य रहाणेने १ कोटीमध्ये सूचीबद्ध केले होते. दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन केले नव्हते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५१ आयपीएल सामन्यांमध्ये ३१.५३ च्या सरासरीने ३९४१ धावा केल्या आहेत. रहाणे काही निवडक खेळाडूंपैकी आहे ज्याच्या एका हंगामात २ पेक्षा जास्त शतक आहेत. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याच्या कर्णधारपदात २०१८च्या हंगामात राजस्थान रॉयल्स प्ले ऑफ पर्यन्त पोहचला होता.

मागील काही काळापासून अजिंक्य रहाणे त्याच्या खराब परफॉर्मन्स मुळे चिंतीत होता. अनेक वर्षे राजस्थान सोबत खेळल्यानंतर २०१९ मध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सला शिफ्ट करण्यात आले होते. आयपीएल २०२१ हंगामासाठी दिल्लीने अजिंक्यला रिटेन केले होते.मात्र त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला २०२१ हंगामातील सामन्यात बाहेर बसवण्यात आले होते. कोलकता काही वर्षांपूर्वी अजिंक्यला आपल्या संघात आणण्यास उत्सुक होती. आता अजिंक्य किंग खानच्या कोलकता संघात नव्याने सुरुवात करताना दिसेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!