Share

आदित्य ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले,‘कुणी कुणाच्या पाठीत खंजीर…’

Published On: 

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) प्रचार करण्यासाठी गोव्यात पोहोचले असून याच पार्श्वभूमीवर काल(१२ फेब्रु.)आदित्य ठाकरे यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. तसेच मागील ५ वर्षांमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असेही आदित्य म्हणाले. दरम्यान, आदित्य यांच्या या टीकेवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात एका मुलाखतीत बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘सर्वांनाच माहित आहे की भाजपसोबत युतीमध्ये शिवसेना निवडून आली. भाजपच्या स्टेजवर मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केली. त्याला तुम्ही समर्थन दिलं. तुमच्या सगळ्या लोकांनी मोदींचा फोटो लावून लावून मतं मागितली. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेले. राज्याच्या जनतेला नीट माहिती आहे की कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले होते की,‘आमची जेव्हा भाजपसोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. परंतु मागील ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. हेच एनडीएतील इतर पक्षांसोबतही झाले’, असे आदित्य म्हणाले.

 महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!