🕒 1 min read
नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा, रॅलींवर कडक निर्बंध लागू केले होते. परंतु आता ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने निवडणूक आयोगाने प्रचारासंदर्भात पुन्हा एकदा नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
नव्या गाईडलाईन्सनुसार आता ५० टक्के गर्दीसह रॅलीला परवानगी देण्यात आली असून रोड शोला मर्यादित संख्येने मंजूरी देण्यात आली आहे. तसेच आता १ हजार लोकांच्या भेटीसाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे. तसेच १० ऐवजी २० लोकांसह घरोघरी प्रचाराची देखील परवानगी मिळाली असून स.८ ते रात्री १० वाजेपर्यंत निवडणूक प्रचारात सूट देण्यात आले आहे. फक्त इतकेच नाही तर ३०० ऐवजी ५०० लोक आता इनडोअर मीटिंगला उपस्थित राहू शकतील.
दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रचार सभांसाठी आणि रॅलींसाठी निवडणूक आयोगानं जरी सूट दिली असली, तरी उमेदवारांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “हमको गिराते गिराते खुद गिर गये”, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका
- “काही लोकांना भुंकण्याची सवय असते”, संजय राऊतांची किरीट सोमय्यांवर अप्रत्यक्ष टीका
- IPL AUCTION 2022: मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी लागणार ‘या’ खेळाडूंवर बोली
- “मुख्यमंत्र्यांचे विधान केवळ धक्कादायकच नाही तर महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव”,अतुल भातखळकरांची टीका
- IPL AUCTION 2022: ‘परी म्हणू कि सुंदरा’ सनरायजर्स हैदराबादची सीईओ काविया मारन पुन्हा चर्चेत


