भंडारा : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताच नाना पटोले हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. काँग्रेससह विविध पक्षांनी व संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
दुसरीकडं, गेल्या काही दिवसांपासून इंधनांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केल्याचं समोर आलं आहे. यामुळे सामन्यांच्या खिशावर आर्थिक बोजा वाढत आहे. केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन व महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज भंडाऱ्यात पद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या पदयात्रेनंतर सभेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, पण काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सरसकट वीजबिल माफ करू’ असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून काँग्रेसची नाराजी अनेकदा उघड झाली होती. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वतःच्या पक्षाचं सरकार स्थापन करण्याचं विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
‘शेती पंपाचे बिलं दुरुस्त केले जातील. शेती पंपाचं अर्ध बिल माफ करण्यात येईल. वीज बिलाच्या या अर्ध्या पैशात वीजेच्या पायाभूत सुविधा (इन्फ्रास्टक्चर) उभ्या केल्या जातील. काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करु, आता आघाडीचं सरकार आहे. लॅाकडाऊनमध्ये आलेलं काही बिल माफ करावं, ही काँग्रेसची भूमिका आहे.’ असं भाष्य नाना पटोले यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कसोटीगिरी’ साठी नावाजलेल्या पुजाराचं तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन !
- प्रीती झिंटाच्या पंजाबने ‘शाहरुख खान’ला केलं आपल्या संघात शामिल !
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालता मग…वशाटोत्सव आणि साहित्य सम्मेलनही रद्द करा – संभाजी ब्रिगेड
- ‘अमिताभ बच्चन यांचा मेमरी लॉस झाला आहे का?’


