Share

“…म्हणून चार राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली”, भाजप आमदाराने सांगितले कारण

Published On: 

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चार राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाल्या मागचे कारण सांगितले आहे.

यासंदर्भात बोलत असताना गणपत गायकवाड म्हणाले की,‘पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये एकहाती सत्ता आली असून महाराष्ट्रात २०-२० टक्क्यांवाले ६० टक्क्यांमध्ये पास झाले. आम्ही एकट्याने ४० टक्के मार्क घेतले. त्यामुळे या लोकांनी एकत्र येत आम्हाला नापास केलं. जनतेने आम्हाला नापास केले नाही.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘आपली घराणेशाही चालवण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र आले असून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची घराणेशाही चालवण्यासाठी लोकांचा विश्वासघात केला. त्यामुळे देशातील जनतेने भाजपचा विश्वासघात होऊ नये यासाठी एकहाती सत्ता दिली. चार राज्यांमध्ये एकहाती सत्ता भाजपच्या हातात देण्याचा निर्णय जनतेने घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,’ असेही गायकवाड यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!