मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज (११ मार्च) मुंबईत दाखल झाले असून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, तद्पश्चात मुंबईत भाजपच्या प्रदेशकार्यालयाबाहेर बोलत असतांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे देवेंद्र फडणवीस राज्याला मिळालेलं ‘गॉड गिफ्ट’ असल्याचे म्हंटले आहेत.
यावेळी बोलत असतांना पडळकर म्हणाले की,‘देवेंद्र फडणवीस हे परमेश्वराने महाराष्ट्राला दिलेले एक गिफ्ट आहे. ते तळहाताच्या फोडासारखं जपायचं हे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी ठरवलं आहे. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही ते २० तास काम करत होते आणि विश्वासघाताने विरोधी पक्षात गेले तरी ते लोकांसाठी २० तास काम करत आहेत’, असे पडळकर म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कितीही षडयंत्र रचली गेली तरी गावखेड्यापासून ते शहरापर्यंत ते अगदी झोपडपट्टीतील माणसाला त्यांचा हेतू माहित आहे. त्यामुळे वाईट राजकारण फडणवीस करत नाहीत,’ असेही पडळकर यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
हे काय? जडेजाची स्टाईल ढापली! शाहीन आफ्रिदीचा लेफ्ट आर्म स्पिन करताना व्हिडीओ होतोय व्हायरल
“शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत”, गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र
‘माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा’ – किरीट सोमय्या
‘भाजपमधल्या भ्रष्टाचारी लोकांवर पंतप्रधान का बोलत नाहीत?’; नाना पटोलेंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

