Share

“८०, ९० , १०० वर पोहोचेपर्यंत ‘ते’ शॉट खेळणे टाळावे”; सुनील गावस्करांचा कर्णधार रोहितला सल्ला

Published On: 

मुंबई: मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. रोहित शर्माने भारताला वेगवान सुरुवात करून दिली पण पुल शॉटच्या प्रयत्नात तो २८ चेंडूत २९ धावा काढून बाद झाला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर म्हणाले की, रोहितसाठी पुल शॉट फायदेशीर ठरू शकते, मात्र मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचेपर्यंत तो शॉट खेळणे त्याने टाळावे.

रोहित शर्माला (rohit sharma) मोलाचा सल्ला देत सुनील गावस्कर (sunil gavaskar) यांनी सांगितले “त्याने याचा विचार केला पाहिजे. जर तो शॉट तुम्हाला खूपदा आऊट होण्याचे कारण बनत असेल तर ते नक्कीच बरोबर नाही. त्याने दोन चौकार पुल शॉटवर मारले, ज्यावरून तुम्ही म्हणू शकता की तो फलदायी आहे पण तो एकमेव शॉट नाहीये. त्याला इतर अनेक शॉट्स मिळाले आहेत. आता प्रत्येक गोलंदाज ज्याच्याकडे थोडाफार वेग आहे तो त्याच्या संधीचा अंदाज घेत असेल. त्यामुळे, त्याला टक्केवारी काढण्याची गरज आहे. तरीही टक्केवारी त्याच्या बाजूने काम करत असल्याचे त्याला वाटत असल्यास त्याने ते खेळावे. सध्या टक्केवारी त्याच्या बाजूने काम करत नाही, त्यामुळे तो ८०, ९० , १०० पर्यंत पोहोचेपर्यंत पूल शॉट खेळणे टाळू शकतो.”

मोहाली कसोटी सामन्यात रोहित, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी आणि विराट कोहली या तिघांनीही चांगली सुरुवात केली पण ते वेळेआधीच बाद झाल्यामुळे मोठ्या धावा करू शकले नाही. मात्र, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी मोठी धावसंख्या करून भारतीय संघाला विजयापर्यंत नेले. दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाचे लक्ष आता बेंगळुरूमधील दुसऱ्या कसोटीकडे वळले आहे. १२ मार्चपासून चिन्नास्वामी स्टेडियमवर डे नाईट असलेला दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!