Share

शेतकरी अपघात विमा योजनेचे स्वरूप काय आहे? लाभ कसा दिला जातो? पहा…

Published On: 

🕒 1 min read

लातूर: मधल्या काळात शेतकरी अपघात विमा योजनेची प्रक्रिया थांबविली होती. यामुळे प्रत्यक्ष मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हती. आता ही समस्या सुटली आहे. विम्याच्या रकमा बॅंक खात्यामध्ये त्वरीत जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. ही योजना खंडित का केली होती? कारण नेमके काय? पाहूया सविस्तर…

शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभदा बऱ्याच शेतकऱ्यांना होणार आहे. 1 डिसेंबर 2016 पासून स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही राबवली जात आहे. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आले तर या योजनेतून मदत रक्कम ही दिली जाते. डिसेंबर 2020 ते 7 एप्रिल या दरम्यानच्या कालावधीत योजनेचा करार संपला होता त्यामुळे ही योजना बंद होती. दुसरीकडे शेतकऱ्यांचे दावे स्वीकारले जात होते पण प्रत्यक्ष मदत मिळत नव्हती. शेतकऱ्यांच्या दाव्यांना प्रशासकीय मंजूरी नव्हती. आता नव्याने करार झाल्याने विम्याचा मार्ग खुला झाला आहे आणि या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर 2 लाख आणि अपंगत्व आले तर 1 लाख मदत –

ज्या काळात योजना ही खंडीत होती त्या दरम्यान, 1 हजार 168 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू तर 17 शेतकऱ्यांना अपंगत्व आल्याचे दावे कृषी विभागाकडे दाखल झाले आहेत. अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर 2 लाख आणि अपंगत्व आले तर 1 लाख असे स्वरुप आहे. त्यानुसार आता या शेतकऱ्यांना लवकरच मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!