लातूर : वातावरण बदलत असल्याने शेतकऱ्यांनी पिक काढणीचे चांगलेच मनावर घेतले आहे. शेतकरी आता काढणी, मळणी आणि लगेच विक्री असेच धोरण शेतकऱ्यांनी सुरु केले आहे. त्यामुळेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे. सोयाबीन अंतिम टप्यात असल्यामुळे दरातही सुधारणा झाली आहे.
वातावरण बदलामुळे शेतीमालाचे नुकसान होऊ नये. म्हणून शेतकरी हा निर्णय घेत आहेत. आठवड्याच्या शेवटच्या टप्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा देखील झाली आहे. या आधीपेक्षा 10 हजार पोत्यांवरील आवक थेट 25 हजार पोत्यांवर गेली आहे. व शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7 हजार 370 रुपये प्रति क्विंटलचा दर होता. आता ७० रुपयांनी दरात वाढ झाली आहे.
सोयाबीन दरात वाढ –
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 7 हजार 300 वर स्थिरावले होते. आता आठवड्याच्या शेवटी सोयाबीन दरात घसरण होत आहे अशी शक्यता होती परंतु, शुक्रवारी 70 रुपायांची वाढ झाली आहे. दरवाढी बरोबर सोयाबीनची आवकही वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भर आता साठवणूक केलेल्या सोयाबीनवर आहे. साठवणूक केलेला सोयाबीन शेतकरी बाजारात नेत असल्याचे दिसत आहे. तसेच आणखी दर वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –


