Share

‘शेतकऱ्यांनी फुलेंचा “असुड” उगारला तर महाराष्ट्रात भाजपाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही’

Published On: 

पुणे : देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेले २९ दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे, या कायद्यांच्या समर्थकांची देखील संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज भाजपचे आज राज्यभर ‘शेतकरी संवाद अभियान’ सुरु आहे.

या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचत विरोधकांना देखील झापलं आहे.

‘मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत’ अशी टीका त्यांनी केली आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना जळजळीत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देवेंद्रजी डोक्यात घातलेली पगडी म. ज्योतिराव फुले यांची आहे हे विसरू नका. ती घातल्यानंतर खरेच बोलावे लागते बरं का ! महाराष्ट्राची दिशाभूल करू नका. शेतकऱ्यांनी फुलेंचा “असुड” उगारला तर महाराष्ट्रात भाजपाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही.’ अशी खोचक टीका मिटकरींनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!