अकोला – ग्राम पंचायत निवडणूक तसेच नाताळ व नववर्षाचे अनुषंगाने अवैध मद्यविक्रीस आळा घालण्यासाठी अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला या कार्यालयाकडून अकोला शहर व वाघजाळी ता. बार्शीटाकळी येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत आठ गुन्हे नोंदविण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अद्याप पर्यंत ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हे धाडसत्र सुरु राहिल असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांनी कळविले आहे.अकोला शहरात व वाघजाळी ता. बार्शीटाकळी याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहीममध्ये मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमाखाली एकुण आठ गुन्हे नोंद करण्यात आले. या कारवाईत एकुण सहा आरोपीना अटक करून त्यामध्ये ३५.०८ लि. देशी दारू,हातभट्टी दारू २० लि. व १४०५ लि. मोहा रसायन असा एकुण ४३ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्हा अन्वेषण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अकोला विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक,सहा.दुय्यम निरीक्षक, जवान, व जवान-नि-वाहनचालक यांनी सहभाग घेतला यापुढेही अवैध मद्यविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क, अकोला विभागाचे धाडसत्र कार्यरत राहील,असे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, अकोला स्नेहा सराफ यांनी कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- फक्त एका क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी झाले जमा
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- न्याय, पैसा, हमीभाव आणि सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी,प्रीतम मुंडेंचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर


