धुळे : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील मुदत संपणाऱ्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 जानेवारीला या निवडणुकांचं मतदान होणार असून आता राजकीय वातावरण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी पक्षांच्या पुरस्कृत पॅनल्समध्ये चढाओढ चांगलीच रंगणार आहे. मराठवाड्यात देखील आता नेत्यांनी कंबर कसल्याच दिसून येत आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना खुलं आव्हान दिलं आहे.
जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असा पण त्यांनी केल्याने आता ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. दरम्यान, ‘राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे’ असं म्हणत सत्तारांनी शड्डू ठोकला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फक्त एका क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी झाले जमा
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ४३ हजारांची अवैध दारु जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
