मुंबई : शेतकरी आंदोलन एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने बळीराजाला मोठे गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतीचा पुढील हप्ता जारी केला आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत पाठवली जाते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बटण प्रेस करून 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत जारी करण्यात आली आहे.
यावेळी मोदी म्हणाले, आज एका क्लिकवर देशातील ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. ही योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून १ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्या महाविकासआघाडीची पार्टी जोरात चालू आहे’
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- कोरेगाव भीमा: जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबरपासून 4 दिवस संचारबंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
