Share

‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. भाजपाने हा कार्यक्रम शुक्रवारी ‘उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या आयोजित कार्यक्रमांमध्ये एक कोटी शेतकरी सहभागी होतील हे सुनिश्चित करण्यात आलेय.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते. पीएम किसान योजना लाँच केल्यानंतर मोदी देशातील शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात गुरुवारी रात्री उशिरा माहिती दिली आहे. देशातील बळीराजासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वपूर्ण असेल. दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 कोटी रुपयांची रक्कम म्हणजेच प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहेत.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावरून विरोधकांना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा करणार… शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!