Share

नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार

Published On: 

मुंबई  – भगवान येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवान येशू ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केले. वर्षअखेरीस येणारा नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळ यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे.

दरम्यान, यंदा सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन केले पाहिजे. स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे कोरोनापासून संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडूया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!