🕒 1 min read
श्रीलंका : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा हा सुरुवातीपासुनच अडचणीत सापडत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्ध मालिकेसाठी नवा संघ उभा करण्यात आला. यादरम्यान श्रीलंकेच्या नव्या संघातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर ही मालिका ५ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे निर्धारित कार्यक्रमानुसार ही मालिका १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरु होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या सुधारित वेळापत्रकानंतर श्रीलंका क्रिकेटने दोन्ही संघात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नवीन वेळा देखील शेअर केल्या आहेत.
दरम्यान, ‘संघातील सर्व खेळाडूंना एकजुटीने ठेवण्यात आणि त्यांना मानसिक स्थितीने सकारात्मक ठेवण्याचे काम कर्णधाराचे असते. मीसुद्धा याच दृष्टीने काम करेन,’ असा विश्वास श्रीलंका दौऱ्याचा कर्णधार असलेला शिखर धवन याने व्यक्त केला आहे.
धवनने फॉलो द ब्ल्यूज या कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ‘भारतीय संघाचा कर्णधार बनणे हे माझ्यासाठी खूप मोठे यश आहे, मिळालेली ही साधी माझ्यासाठी खूप मोठी आहे. एक कर्णधार म्हणून सर्वांनी एकजूटता दाखवून आनंदी रहावे, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
आमच्याकडे एक चांगला संघ तसेच शानदार सहयोगी स्टाफ आहे. आम्ही याआधीही एकत्रित काम केलेले आहे.’ तसेच श्रीलंका दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या द्रविड बद्दल बोलताना धवन म्हणाला, ‘राहुल भाईसोबत माझे संबंध खूप चांगले आहेत. रणजी क्रिकेटमध्ये जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा मी त्यांच्याविरुद्ध खेळलो आहे. भारत अ संघाकडून खेळताना मी कर्णधार होतो आणि त्यावेळी प्रशिक्षक म्हणून द्रविडच होते. ज्यावेळी द्रविड यांच्याकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी आली, तेव्हा आम्ही सुमारे २० दिवस तिथे जात होतो. त्यामुळे त्यांच्यासोबत खूप चर्चा व्हायची. आता आम्हाला सहा सामने एकत्र खेळण्याची संधी मिळाल्याने मजा येईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘टीममधील तरुण खेळाडूंवर दबाव टाकत आहेत’ ; दिग्ग्जाचा मोठा दावा
- काउंटी स्पर्धेत अश्विनचा बळींचा सिक्सर, सरे संघाकडून खेळताना केली कामगीरी
- मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?
- अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, मालिकाही गमावली
- कार्तिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकिस्तानी क्रिकेट रसिक खुश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
