मुंबई : श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टवर राम मंदिरासाठी लागणाऱ्या जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे देशात मोठी खळबळ माजली आहे. राज्यातील राजकारणात राम मंदिराच्या घोटाळ्यामुळे राजकीय वर्तुळ चांगलेच ढवळून निघालं आहे. राम मंदिर उभारणीत होणारा भ्रष्टाचार दुर्दैवी असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटलं आहे. तसेच देणगी देणाऱ्या कोट्यावधी लोकांचा अपमान झाला असल्याचे म्हटलं आहे.
यानंतर आता ‘अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही, हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
राम मंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आणि शिवसेना व भाजप यांच्यात बुधवारी झालेली हाणामारी यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी अराजकीय समितीची मागणी पुढे केली. ही समिती राम मंदिर उभारणीतील जमाखर्च आणि त्याचा हिशोब ठेवण्याचे काम करेल. त्रयस्थ समितीच्या निरीक्षणाखाली सर्व गोष्टी झाल्यास आक्षेप घेतला जाणार नाही, असे पाटील म्हणाले.
तसेच अतिशय भक्तिभावाने राम मंदिर उभे व्हावे अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे म्हणून रामभक्त मोठ्याप्रमाणावर निधी देत आहेत. मात्र राममंदिर उभारणीत गोळा होणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे अशी तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- राकेश टिकैत यांचा एल्गार, शेतकरी देशातील सर्व राजभवनांना घेराव घालणार
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- ‘अशोक चव्हाणांनी जनहिताचे कामे करावीत’, खा.चिखलीकरांचा टोला
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’


