Share

‘आता काय सुप्रीम कोर्टही देशद्रोहींसोबत आहे का?’ काँग्रेस नेत्याचा मोदींना खोचक सवाल

Published On: 

मुंबई : महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचा आवाज दडपण्यासाठी ब्रिटिशांनी देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला होता. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून अजूनही या वसाहतवादी कायद्याची आवश्यकता आहे का असा सवाल सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केंद्र सरकारला दोन दिवसांपूर्वी केला होता. या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे मत मागविले असून तशी नोटीसही जारी केली.

या अनुशंगाने काँग्रेसकडून भाजपावर हल्लाबोल करण्यात येत आहे. मुंबईतील काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ‘कोर्टाने हा कायदा रद्द का केला नाही असे विचारले आहे. मग आता काय सुप्रीम कोर्टही देशद्रोहींसोबत आहे का?’ असा खोचक प्रश्न निरुपम यांनी विचारला आहे.

‘ब्रिटिशांनी बनवलेला राजद्रोह कायदा रद्द झाला पाहिजे. काँग्रेसने जेव्हा आपल्या जाहीरनाम्याच हे आश्वासन दिले होते, तेव्हा भाजपाने आम्हाला देशद्रोहींचे समर्थक म्हटले होते. आता सुप्रीम कोर्टाने विचारले आहे की ब्रिटिशांचा हा कायदा अजून रद्द का नाही केला? मग काय आता सर्वोच्च न्यायालय देशद्रोहींसोबत आहे का?’ असा प्रश्न संजय निरुपम यांनी विचारला आहे.

देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका दाखल झाली आहे. तिच्या सुनावणीप्रसंगी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशद्रोहाचा कायदा म्हणजे सुताराच्या हातात करवत देण्यासारखे आहे. तो त्या हत्याराने सारे जंगलच कापून टाकेल. तशाच रीतीने देशद्रोहाच्या कायद्याचाही गैरवापर होण्याची शक्यता आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ अन्वये देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे असे ऐकताच संबंधित आरोपी भयभीत होतो. या कायद्याचा वापर करणाऱ्या यंत्रणांच्या उत्तरदायित्वाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!