Share

मोठी बातमी! शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट

Published On: 

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली.

पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींनी संवाद साधला. भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सहकार आणि बँकिंग यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. चीनशी सीमावादाचे पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता पाहता संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी माजी संरक्षण मंत्री शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांना सीमेवरील नेमक्या स्थितीची माहिती दिली.

तर त्यापूर्वी राज्यसभेचे नवनिर्वाचित सभागृह नेते पीयूष गोयल यांनी दिल्लीत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा तपशील कळू शकलेला नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद वाढल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज लढविले जात असताना या भेटीला महत्त्व प्राप्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!