Share

न’स्तिक’ की मनोहर? कसा रंगणार औरंगाबाद शहरातील सामना?

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबादच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय आणि बाबसाहेब मनोहरे यांच्यात चांगलाच सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. वास्तविक मनोहरे यांची नियुक्तीच पांडेय यांना रुचलेली नाही. त्यामुळे या पदावरुन या दोघांत चांगलाच सामना रंगणार हे निश्चित आहे. मात्र, हा सामाना कसा असेल, याची उत्सुकता वाढत आहे.

याची छोटी झलक खाम नदी स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने दिसून आली. दर शनिवारी नागरिकांच्या सहभागातून खाम नदीची स्वच्छता करण्याचा उपक्रम आखण्यात आला आहे. सीईओ असताना पांडेय यांनीच या उपक्रमाची सुरूवात केली होती. मात्र, अचानक नवीन सीईओ दाखल झाल्यानंतर पांडेय यांनी या उपक्रमाकडे पाठ फिरवली होती.

आता पांडेय पुन्हा खाम नदी स्वच्छता मोहिमेशी जोडले गेले आहेत. मोहिमेला नवीन सीईओ बाबासाहेब मनोहरे उपस्थित नव्हते. अशात पांडेय यांनी मात्र, यात हिरेरीने सहभाग घेत, कचरा जमा करण्याचेही काम केले. नव्या सीईओंची अनुपस्थिती आणि पांडेय यांचा सक्रीय सहभाग याचीच चर्चा शहरात दिवसभर दिसून आली. सीईओ पदी रुजू झाल्यानंतर लगेचच ‘सुपर संभाजीनगर’ बोर्ड प्रकरणात चौकशी करणार असल्याचे मनोहरे यांनी जाहीर केले होते. या दोन्ही प्रकरणावरुन या दोन ‘बड्या’ अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात चांगलाच ‘सामना’ रंगणार असे चित्र दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!