Share

आदित्य ठाकरेंकडून युकेतील अधिकारी गिरवणार मराठीचे धडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज मराठी भाषा दिन. यानिमित्ताने जगभरातून मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेला उजाळा दिला जात आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात मराठीचा डंका वाजत आहे. असाच एक अनुभव आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

त्याचे झाले असे की, अॅलन गमेल या आंतरराष्ट्रीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ट्विटरवरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ”मी अशात हिंदी भाषा शिकत आहे. परंतू मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे मला मराठी शिकवतील अशी अपेक्षा आहे” असे म्हणत अॅलन गमेल यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, त्यांच्या ट्विट शुभेच्छांचा आदित्य ठाकरे यांनी स्वीकार करत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये आदित्य म्हणतात की, ”मी आपल्याला साधारण ५-६ वर्ष ओळखतो आणि महाराष्ट्रावर असलेलं आपलं प्रेम बघून मला खात्री आहे की आपण येत्या काही महिन्यातच उत्तम रित्या मराठी बोलाल. नक्कीच, सांगा कधी सुरुवात करायची?” असा प्रश्न आदित्य यांनी अॅलन यांना विचारला आहे.

अॅलन हे इंग्लडमधील दक्षिण आशियाचे मॅजेस्ट्रीचे व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारताचे उपायुक्त आहेत. ते विविध कामांच्या निमित्ताने भारतातील अनेक बड्या मंत्र्यांच्या संपर्कात असतात. १५ फेब्रुवारी रोजी मंत्री आदित्य ठाकरे आणि अधिकारी अॅलन यांची भेट झाली होती. यावेळी दोघांनीही महाराष्ट्रातील पर्यावरण आणि पर्यटनस्थळांबाबत चर्चा केली. दरम्यान, मराठी भाषा दिनाच्या ट्विवच्या चर्चेनंतर आदित्य हे अॅलन यांना मराठी बाराखडी शिकवताना, तसेच मराठी व्याकरणाचे धडे देताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!