मुंबई-आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतुन मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी अधिकृतपणे दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, प्रत्येक वर्षी या दिनदर्शिकेत इंग्रजी महिन्यांसोबतच मराठी महिन्यांचा सुद्धा उल्लेख करण्याचा कायदा आहे. परंतु 2021 च्या दिनदर्शिकेत मराठी महिन्यांचा उल्लेखच गाळला गेला आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई मंत्री असलेल्या उद्योग विभागाच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली असली तरीही यात पर्यटन विभागाची प्रसिद्धी करण्यात आली आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिने काढून टाकण्यामागील बोलविता धनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आहेत काय? असा प्रश्न सुद्धा आमदार भातखळकर यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या दिनदर्शिकेतून मधून मराठी महिने आणि तारखा गायब. ठाकरे सरकारचे हिंदुत्वही बेगडी आणि मराठी बाणाही बोगस…. pic.twitter.com/dD78HbpQZu
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 27, 2021
मराठी शाळेत शिक्षण घेतले म्हणून मुंबई महानगरपालिकेत नौकरी नाकारणे, मराठी विद्यापीठ स्थापन करण्याला जाणीवपूर्वक उशीर करणे, मराठी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरविणे, मुंबईतील मराठी शाळा बंद करणे अशा अनेक प्रकारांमधून ठाकरे सरकारचे व शिवसेनेचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट होते, असे सुद्धा आ. अतुल भातखळकर म्हणाले.
ठाकरे सरकारने ही दिनदर्शिका तात्काळ मागे घेऊन त्यात मराठी महिन्यांचा उल्लेख करूनच नव्याने प्रकाशित करावे, अन्यथा आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- आरोग्य विभागात गुणवत्तेलाच प्राधान्य ; आरोग्यमंत्र्यांनी दिला परीक्षार्थींनी धीर
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

