Share

खा.उदयनराजेंची राज ठाकरेंसोबत मराठा आरक्षणावर चर्चा

Published On: 

मुंबई : भाजप खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरे यांची मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. कौटुंबीक विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ते राज यांना भेटले. यावेळी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना यांना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच ‘कृष्णकुंज’वर गेले होते. याबद्दल राज यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्ट केले. मात्र, मराठा आरक्षणावर राज यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगतिले. ते म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये असे त्यांना सांगितले होते. कोणाच्या आरक्षणावर गदा देखील येऊ नये.

इतर समाजातील नेत्यांना जसा न्याय मिळाला तसा मराठा समाजातील लोकांना देखील भेटायला हवा. शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा नाहीतर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असे उदयनराजे म्हणाले. उद्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीचे आयोजन केले आहे, त्यानुषंगानेही चर्चा झाल्याचे उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, चुकीचे काम केले असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग शिक्षा करणारा उदयनराजे का असेना, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजप नेते उदयनराजे यांनी आपले मौन सोडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!