🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक बैठक हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत दुधाच्या दरात एक रुपयांची वाढ करून प्रति लिटर २८ रुपये दराने खरेदी करण्याचा महत्वाचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय केवळ दुधाच्या खरेदीसाठीच घेण्यात आल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
दूध भुकटी प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास देखील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सभेत मान्यता देण्यात आली. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने सभा घेण्यात आली. या सभेमध्ये दुध भूकटी प्रकल्पाच्या मान्यतेबरोबर विविध विषयांची चर्चा देखील करण्यात आली. कोरोना काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांचा खप कमी झाला आहे. तरी देखील संस्थेला दहा लाख रुपयांचा नफा झाला. शेतकऱ्यांना २० पैसे प्रति लिटर या प्रमाणे बोनस देण्यात आला. याशिवाय कर्मचाऱ्यांनाही घसघशीत बोनस दिल्याचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी सांगितले.
दुधाचे भाव वाढवल्याने मात्र दुध उत्पादक सुखावले आहेत. तर दुधाची भुकटी औरंगाबादमध्ये तयार होणार असल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगदार देखील मिळणार असल्याने कोरोना तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये आनंद वार्ता कानावर आल्याने दुध उत्पादकांसह दुध, सहकार क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वीज कनेक्शन तोडणाऱ्यांनी खुर्ची लिलावाची आठवण ठेवा : संभाजी पाटील
- आदित्य ठाकरेंकडून युकेतील अधिकारी गिरवणार मराठीचे धडे
- कोरोनामुळे शाळा बंद , विद्यार्थीनींच्या हक्काचा ‘रुपयाही’ शासनाने नाकारला
- खा.उदयनराजेंची राज ठाकरेंसोबत मराठा आरक्षणावर चर्चा
- महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतुन मराठी महिनेच गायब ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
