टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेत आज गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादा बाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. बेकायदा प्रतिबंधक हालचाली विधेयक मंजूर झाले आहे. याबाबत बोलताना अमित शहा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुरावा देत कॉंग्रेसला सुनावले आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक आहे. काँग्रेसकडून या विधेयकाला विरोध होत असला तरी 1967 मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार असताना हे विधेयक आणले होते, असे अमित शहा म्हणाले आहेत.
अमित शहा म्हणाले की, अर्बन नक्षलवाद वाढवण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतील. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमचे सरकार त्यांना कोणतीही सहानुभूती दाखविणार नाही. तसेच दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोहोचविणाऱ्यांना, आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना, दहशतवादी साहित्याचा प्रचार-प्रसार करून तरुणांच्या मनात दहशतवादाची थिअरी रुजवणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दहशतवाद्यांवर कठोर कारवाईने नव्हे तर त्यांच्याशी चर्चा करूनच नियंत्रण आणले जाऊ शकते, या विचारांशी कोणीही सहमत नाही. एखाद्याकडे बंदूक असली म्हणजे तो दहशतवादी होत नाही, तर त्याच्या डोक्यात दहशतवादी विचार असतात म्हणूनच तो दहशतवादी बनतो, असेही अमित शहा म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

