🕒 1 min read
नागपूर: विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ याला नागपूर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस सुनावली आहे. ३१ जानेवारी रोजी आपल्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडिओ प्रसारीत करत शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, परीक्षा आभासी (ऑनलाइन) पद्धतीने घ्या असे आवाहन त्याने केले होते. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. काही काळासाठी या जमावाला आंदोलनाचे स्वरूप आले होते.
दरम्यान पाठकवर विद्यार्थ्यांची माथी भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अखेर त्याला नागपूर पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले होते. विकास पाठक याने मात्र विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. त्याप्रकरणी अधिक चौकशीसाठी त्याला आजची रात्र पोलिस कोठडीतच काढावी लागणार आहे. उद्या पुन्हा त्याला न्यायालयात हजार केले जाणार आहे.
आपल्या शिवराळ बोलण्याच्या स्टाईलने सोशल मीडियावर त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याचच उपयोग करून तो दरवेळी अश्या प्रकारची आव्हाने तरुण पिढीला करत असतो. यापूर्वी मागील वर्षी मे महिन्यात त्याने दादर येथील शिवाजी पार्क परिसरात परीक्षा न घेण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली होती. त्याही वेळी त्याला अटक झाली होती.
महत्वाच्या बातम्या:
- INDVSWI: भारत बनणार १००० एकदिवसीय सामने खेळणारा जगातील पहिला देश
- पुणे महानगरपालिकेतर्फे ” लोकशाही दिनाचे आयोजन”
- VIDEO : अरेच्चा! शहनाज गिलची ‘ती’ स्टाईल अल्लू अर्जुनने तर केली नाही ना कॉपी?
- दलितांवर पुन्हा पाण्यासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली
- “वापरा आणि फेकून द्या हे भाजपचे धोरण…” एकनाथ खडसेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
