यवतमाळ: यवतमाळ जिल्हयातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या केली गेली आहे. सुनील डिवरे Sunil Divare (वय ४०) असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य होते. या हत्येने यवतमाळ जिल्हा हादरून गेला आहे. तीन आरोपींनी त्यांच्या राहत्या घरात घुसून प्रथम गोळीबार केला व नंतर कुऱ्हाडीने त्यांच्या शरीरावर वार करत त्यांची निर्घुन हत्या केली. हा धक्कादायक खून गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडला.
दरम्यान सुनील यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्या अगोदरच त्यांचा जीव गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुनील यांच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. भांबराजा परिसरात सध्या ताणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुरू आहे.
माजी वनमंत्री संजय राठोड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सुनील यांची ही हत्या ही आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा अर्थसंकल्प”, प्रवीण दरेकरांची टीका
- ‘इको-बटालियन’च्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास; भगतसिंग कोश्यारींचे प्रतिपादन!
- ‘तुम्ही तोंड सांभाळून बोला’; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा
- औरंगाबाद शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला; निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा-चंद्रकांत खैरे

