Share

‘कुंभ आणि मरकजमध्ये कोणतीही तुलना होता कामा नये’

Published On: 

हरिद्वार: देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मात्र या बिकट परिस्थितीत देखील हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतल्यानंतर . केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा भीती व्यक्त केली होती. यातच आता, या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.

या नंतर गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या मुस्लिम धर्मीयांच्या मरकज या धार्मिक संमेलनात कोरोना नियमांचा फज्जा उडवला गेला होता. त्यांनतर आता कुंभमेळ्यात करोना नियमांची पायमल्ली होत असल्याने कुंभ ची तुलना मरकजशी केली जात आहे. मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी ‘कुंभ आणि मरकजमध्ये कोणतीही तुलना होता कामा नये’ असे म्हटले आहे. तर मरकजचा कार्यक्रम एका बंदिस्त ठिकाणी पार पडला होता. पण कुंभ एका मोकळ्या ठिकाणी गंगेच्या किनारी पार पडत आहे,’ असं तिरथ सिंह रावत यांनी सांगितलं आहे.

तसेच ‘मरकजचा कार्यक्रम पार पडला तेव्हा करोनासंबंधी इतकी जागरुकता नव्हती किंवा कोणतीही नियमावली नव्हती. कार्यक्रमासाठी हजेरी लावणारे किती काळ तिथे वास्तव्यास होते याची कोणालाही कल्पना नाही,’ तसंच कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो आणि हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेचा विषय असल्याचंही ते म्हणाले आहेत. लोकांचं आरोग्य प्राथमिकता आहे, पण श्रद्धेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!