Share

‘पुतळ्यांसाठी २० हजार कोटी आहेत, मग लसीकरणाला ३० हजार कोटी नाहीत का?’

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तिसऱ्यांदा या पदावर विराजमान होणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राज्याची सूत्रे हाती घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून सर्वांना लवकरात लवकर मोफत लस उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पण पंतप्रधान मोदी यांनी अद्याप लसीकरणाच्या मुद्दयावरील माझ्या पत्राला उत्तर दिलेलं नाही, असे ममता यांनी आज सांगितले.

ममता म्हणाल्या, ‘मोफत लसीकरणाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींकडून मला अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही. नवीन संसद आणि पुतळे बांधण्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च करत असताना लसीकरणासाठी ३० हजार कोटी का दिले जात नाहीत?’ असा प्रश्न त्यांनी केला आहे. ‘पीएम केयर फंड कोठे आहे? मोदी देशातील तरुणांचा जीव धोक्यात का घालत आहेत? त्यांच्या नेत्यांनी कोव्हिड हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे तर ते इथे येत आहेत. ते इथे येऊन कोव्हिड पसरवत आहेत’ अशी टीका मुख्यमंत्री ममता यांनी केली आहे.

पत्रात काय म्हटले होते?
ममतांनी आपल्या पत्रात राज्यात ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित करत विद्यमान यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली. कोरोना महामारीचे गांभीर्य पाहता वेगाने लसीकरण करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस उपलब्ध करून द्यायला हवी. लसीकरणाच मुद्दा पारदर्शक पद्धतीने हाताळायला हवा, असे ममता म्हणाल्या. लसीचा तुटवडा असल्याने १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण शक्य नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!