Share

‘बंगालमध्ये सर्वांना तत्काळ मोफत लस द्या’, ममतांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तिसऱ्यांदा या पदावर विराजमान होणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राज्याची सूत्रे हाती घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून सर्वांना लवकरात लवकर मोफत लस उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

ममतांनी आपल्या पत्रात राज्यात ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित करत विद्यमान यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली. कोरोना महामारीचे गांभीर्य पाहता वेगाने लसीकरण करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस उपलब्ध करून द्यायला हवी. लसीकरणाच मुद्दा पारदर्शक पद्धतीने हाताळायला हवा, असे ममता म्हणाल्या.

लसीचा तुटवडा असल्याने १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. मोदींनी ट्विटद्वारे ममतांना शुभेच्छा संदेश दिला होता. या संदेशाचे ममतांनी देखील ट्विद्वारेच आभार मानले. पश्चिम बंगालच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!