Share

‘पश्चिम बंगालमध्ये अराजकता, राष्ट्रपती राजवट लागू करा’, गिरीश महाजनांची मागणी

Published On: 

जळगाव : पश्चिम बंगालमध्ये ३८ टक्के मते भाजपच्या पारड्यात टाकली. पूर्वी तीन आमदार होते. आता ७५ आमदार झाले. निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये अराजकता माजलेली आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण होतेय. त्यांची घरे जाळली जात आहेत. तृणमुल काँग्रेसच्या धुडगुसामुळे कायदा व सुव्यवस्था कोडमललेली आहे असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलाय.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निषेध व्यक्त केल्यानंतर भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी महाजन यांनी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना टार्गेट करणे सुरू केले. कार्यालये पेटवून दिली, असा आरोप करत भाजपने आंदोलनाची हाक दिली होती. यावल, रावेर, फैजपूर, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, जामनेर आदी ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तृणमूलचा निषेध केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. सुरुवातीपासून तिन्ही पक्षांमध्ये मराठा आरक्षणाबाबत एकवाक्यता नव्हती. तिन्ही पक्ष भांडत होते. नेते वेगवेगळी मते मांडत होती. हे आरक्षण व्हावे असे सरकारमधील मंत्र्यांना वाटत नव्हते. नियोजनाचा व समन्वयाचा अभाव होता. तिन्ही पक्षांच्या विसंगतीमुळे हे आरक्षण टिकवण्यात सरकार अपयशी ठरले असा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!