🕒 1 min read
बीड : बीड दौऱ्यात बुधवारी सकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजप जिल्हा कार्यालयासमोर बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. स्थानिक भाजप कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. दरम्यान, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रवीण दरेकरांसह ८ जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस नाईक आशिष वडमारे यांनी फिर्याद दिली.त्यात म्हटले आहे की, भाजपच्या संघर्षयोध्दा कार्यालयासमोर पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरुध्द भाजप पदाधिकाऱ्यांनी फलक हातात घेऊन सकाळी साडेदहा वाजता आंदोलन केले. संचारबंदी व कोविड नियमांचे उल्लंघन करत केलेल्या या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली.
या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राम कुलकर्णी, अजय सवाई, प्रा.सचिन उबाळे, शरद बडगे, विलास बामणे, नरेश पवार, कल्याण पवार व इतर आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘बंगालमध्ये सर्वांना तत्काळ मोफत लस द्या’, ममतांचे पंतप्रधान मोदींना पत्र
- पाकिस्तानला चपराक! काश्मीरप्रश्नी भारत-पाकने चर्चेतून तोडगा काढावा, संयुक्त राष्ट्राचे आवाहन
- ‘पश्चिम बंगालमध्ये अराजकता, राष्ट्रपती राजवट लागू करा’, गिरीश महाजनांची मागणी
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये ममता समर्थकांकडून केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
