Share

धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये ममता समर्थकांकडून केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निकालानंतर राज्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. भाजप कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. आता पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील पंचखुंडी गावात केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. व्ही. मुरलीधरन हे या हल्ल्यातून बचावले आहेत. पण त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय.

https://twitter.com/VMBJP/status/1390209778798923778

व्ही.मुरलीधरन पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात होते. तेथे केजीटी ग्रामीण विधानसभेतील पंचखुडी भागात त्यांच्या जमावार हल्ला करण्यात आला. हल्ल्यादरम्यान त्यांच्या गाडीच्या काचा तोडण्यात आल्या होत्या. केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन यांनी जमावावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘पश्चिमी मदिनापूरच्या दौऱ्यादरम्यान माझ्या गाडीवर टीएमसीच्या गुंडांनी हल्ला केला. गाडीच्या काचा तोडला. माझ्या पर्सनल स्टाफवर देखील हल्ला करण्यात आला. त्यामुळे मला दौरा मध्यातच सोडून परतावं लागले.

व्ही. मुरलीधरन हे पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय टीमचे सदस्य आहेत. ते पश्चिम मेदिनीपूर मधील हिंसाचाराने पीडित कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांसोबतची बैठक आटोपून ते परत निघाले होते. त्यावेळी काही स्थानिक लोकांनी त्यांच्या गाडीवर जोरदार हल्ला चढवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!