Share

‘ग्रामीण भागात कोविड सेंटरचे दर जास्त’, आरोग्यमंत्री टोपेंना मेहबूब शेख यांचा घरचा आहेर

Published On: 

🕒 1 min read

बीड : कोरोना काळात शासनाने ग्रामीण भागातील हॉस्पिटलसाठी महानगरपालिका हद्दी क्षेत्रातील हॉस्पिटलचे जे दर लागू केले आहेत ते कमी करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले आहे.

शेख यांच्या म्हणण्यानूसार, शहरी भागात शासनाने लागू केलेले दर योग्य आहेत. पण ग्रामीण भागात हे दर जास्त आहेत. एक प्रकारे राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरचा आहेर देत शालेतून जोडे लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची या संदर्भात महेबूब शेख यांनी भेट घेऊन ग्रामीण भागातील कोविड हॅास्पीटलचे दर कमी करावेत या मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे. शासनाने नॉर्मल बेडसाठी दोन हजार, ॲक्सिजन बेडसाठी चार हजार, आयसीयूसाठी सात हजार रुपये दर निश्चित केला आहे.

सदरील दर हे महानगरपालिका क्षेत्रासाठी योग्य आहेत. पण ग्रामीण भागात हे दर कमी करावेत अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली आहे. यावर सकारात्मक विचार करुन दरामध्ये सुधारणा करणार असल्याचे आश्वासन यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महेबूब शेख यांना दिले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी एका महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते. त्यावरून शेख यांच्यावर औरंगाबाद पोलिसांत गुन्हाही दाखल आहे. पण काही दिवसांपूर्वी मेहबूब शेख यांच्या तक्रारीवरून शरद पवार यांच्याविषयी बदनामीकारक लिखाण करून त्यांची प्रतिमा मलिन करणे, त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी फेसबुक आणि ट्विटर वरील २७ अकाउंटवर बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!