मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज मोठा दावा केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपच्या काही लोकांचे मुंबई केंद्रशासित करण्यासाठी मोठे षडयंत्र सुरु असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिले आहे. मुंबईतील काही श्रीमंत ,भाजप नेते आणि बिल्डर यांच्या संगनमताने किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात हे काम सुरु असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावरूनच भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
“भ्रष्टाचार करून जनतेला लुटायच. कोर्टाने लाथाडलं किंवा तोंडावर आपटले की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे असं बरळायचं. मग आपण समजून घ्यायचं दणका बरोबर जागेवर बसलेला आहे. संजय राऊत यांची वाचाळ आणि गचाळ बडबड दुसरं काही नाही.”, अशी टीका राम सातपुते यांनी ट्वीट करत केली आहे.
दरम्यान मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचे सादरीकरण भाजपच्या पाच लोकांनी मुंबईत तयार केले आहे. या चोर, लफंग्याचं नेतृत्व किरीट सोमय्यांकडे असून मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार त्यांना काढायचा आहे. मुंबई वेगळी करुन मुंबईवर केंद्राचं राज्य आणायचं असून किरीट सोमय्या हा लंफगा. चोर, महाराष्ट्रद्रोही हे सादरीकरण घेऊन दिल्लीत जात असतो. आजही त्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: दिल्लीचा दुष्काळात तेरावा महिना; पराभवानंतर कर्णधार ऋषभला भरावा लागणार लाखोंचा दंड!
“महागाईमुळे सामान्य जनता हवालदिल असताना आता औषधाचे दर…”, राष्ट्रवादीचा केंद्रावर निशाणा
राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा आठवतोय का कुणाला?; अमेय खोपकरांनी मिटकरींना पुन्हा डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

