🕒 1 min read
मुंबई: देशात वाढत्या महागाईमुळे आधीच सामान्य जनता हवालदिल असताना केंद्र सरकारने आता औषधाचे दरदेखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता सामान्यांना औषधे घेणेही कठीण केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. या पाठोपाठ आता केंद्र सरकारने ८०० जीवनोपयोगी औषधांचे दर ११ टक्क्यांनी वाढवले आहेत. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले, त्यातच इंधन आता सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.
तसेच आता जे लोक आजारी पडतील त्यांना औषध घेणेही केंद्र सरकारने कठीण केले आहे.देशातील सामान्य लोकांचा विचार न करता हुकुमशाही पद्धतीने हे दर वाढवून मोदी सरकारने सामान्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप तपासे यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
महत्वाच्या बातम्या:
राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा आठवतोय का कुणाला?; अमेय खोपकरांनी मिटकरींना पुन्हा डिवचले
IPL 2022: ‘शॉने आमच्यासाठी काम सोपे केले’; सामना विजयानंतर क्विंटन डी कॉकचे मोठे वक्तव्य
“मुंबई केंद्रशासित करण्याचे सोमय्या आणि भाजपचे षडयंत्र”, संजय राऊतांचा मोठा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
