🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२चा १५वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (DC vs LSG) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार के एल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि ऋषभ पंतला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंतच्या संघाला निर्धारित २० षटकांत १५०/३ अशीच धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरात लखनऊने ६ विकेट्सने सामना जिंकला. त्यानंतर पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठे फेर बदल झाले आहेत.
DC vs LSG यांच्यातील सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा बदल झाला आहे. आजच्या सामन्यात८० धावांची धडाकेबाज खेळी करणारा लखनऊ संघाचा सलामीवीर डी कॉकने (Quinton de kock) ऑरेंज कॅपच्या यादीत शानदार एंट्री केली आहे. त्याने १४९ धावांसह थेट दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. त्याचवेळी राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर अजूनही या शर्यतीत आघाडीवर आहे. यासोबतच केएल राहुललाही खूप फायदा झाला आहे. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
दरम्यान दिल्लीचा संघ पराभूत झाला असला तरी दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवला (kuldeep yadav) या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने पर्पल कॅपच्या यादीत फायदा झाले. कुलदीपचे नाव टॉप ५ विकेट्स घेणाऱ्याच्या यादीत चौथ्या क्रमांकांवर आहे. तर दुसरा यादव म्हणजेच केकेआरचा उमेश यादव या यादीत अव्वल स्थानी आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की, पेंग्विन पण तिथेच आणि मातोश्री…”, अमेय खोपकरांनी साधला अमोल मिटकरींवर निशाणा
- IPL 2022: ‘शॉने आमच्यासाठी काम सोपे केले’; सामना विजयानंतर क्विंटन डी कॉकचे मोठे वक्तव्य
- “मुंबई केंद्रशासित करण्याचे सोमय्या आणि भाजपचे षडयंत्र”, संजय राऊतांचा मोठा दावा
- IPL 2022: ‘त्याने मला बाल्कनीत लटकवलं आणि…’ मुंबईच्या खेळाडूबाबत युझवेंद्र चहलाचा धक्कादायक खुलासा!
- विजय सत्याचाच होईल! संजय राऊत यांचा पुन्हा भाजपला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
