Share

IPL 2022: दिल्लीचा दुष्काळात तेरावा महिना; पराभवानंतर कर्णधार ऋषभला भरावा लागणार लाखोंचा दंड!

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२च्या १५ व्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचा ६ विकेट्सनी पराभव झाला. यासह संघासाठी आणखी एक वाईट गंभीर समस्या समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्स (DC vs LSG) सोबत झालेल्या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला लाखोंचा दंड भरावा लागणार आहे.

या मोसमातील सलग दुसऱ्या पराभवानंतर ऋषभ पंतला (Rishabh pant) या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारिवेळेत कमी षटके टाकली आणि त्यामुळेच त्याची भरपाई कर्णधार ऋषभला करावी लागत आहे. आयपीएलने दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले की,”स्लो ओव्हर रेटसाठी दिल्ली कॅपिटल्सला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२२ मधील आयपीएल आचारसंहितेतील हा दिल्ली कॅपिटल्सचा (DC) पहिला गुन्हा आहे, त्यामुळे पंतला १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.”

दिल्ली कॅपिटल्सला आधीच पराभवाचा मोठा धक्का बसला होता. आता या दंडामुळे कर्णधार ऋषभ पंतची झोप उडाली आहे. लखनऊ विरुद्ध सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीने चांगली सुरुवात केली होती. पृथ्वी शॉ क्रिझवर असताना लखनऊ समोर संघ मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. मात्र गोलंदाजीत दिल्लीच्या सुमार कामगिरीने संघाला पराभूत केले.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!