Share

रोहित आणि विराटच्या वादावर सुनील गावस्करांचा नवीन खुलासा

Published On: 

मुंबई: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या सामन्यातील सोबत सेलिब्रेट करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यांच्यातील वादांची चर्चा संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रोहित आणि विराट यांच्या वादाबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले “रोहित आणि विराटचे का जमत नाहीत? ते भारतासाठी खेळत आहेत. या सर्व चर्चा आपण ऐकताच राहतो त्याही विश्वसनीय सूत्रांनुसार, कथितपणे वगैरे वगैरे. वर्षानुवर्षे हे घडत आहे, हे पहिल्यांदाच घडत नाहीये. त्या दोघांना लोक काय म्हणतात याची पर्वा नाहीये. मग अनेकदा असा अंदाज लावला जातो की माजी कर्णधार जो आता संघातील खेळाडू आहे तो सर्वोत्तम प्रयत्न करणार नाही कारण तो नवीन कर्णधार यशस्वी व्हावा असे इच्छित नाही.हा मूर्खपण आहे कारण जर त्याने धावा केल्या नाहीत किंवा विकेट घेतल्या नाहीत तर तो संघाबाहेर जाईल. म्हणून, या सर्व चर्चा केवळ तर्क आहेत. ज्यांच्याकडे  काही चांगले करायला नसते ते लोक कथा तयार करण्याचा प्रयत्न करतात”

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात अनेक प्रसंग घडले जिथे माजी कर्णधार विराट कोहलीने रोहितला रिव्ह्यू घेण्यास राजी केले आणि रोहितने त्याचे ऐकले. ते रिव्हिव्ह सुद्धा संघाच्या कामी आले. भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहित आणि विराटच्या वादाला “मूर्खपणा” आणि “अफवा ” म्हणून फेटाळून लावले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!