Share

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही – सुप्रिया सुळे

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. त्यात काल पासून अनेक दिग्गज खासदारांनी भाषण केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे.

देशात कोरोना विषाणू पसरविण्यास काँग्रेस जबाबदार आहे. असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील मजुरांना काँग्रेसने स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांना मोफत तिकिटे दिली असा आरोप मोदींनी केला. या त्यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील भाजप विरोधी नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत, मोदींच्या दीड तासाच्या भाषणाकडे मी खूप अपेक्षेने पहात होते, असे त्या म्हणाल्या. कोरोनाच्या जागतिक महामारीतून आपण बाहेर पडत आहोत, राज्ये अडचणीत आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीत या सर्व महत्वाच्या मुद्द्यावर ते काय बोलतील याकरिता आम्ही भाषण एकत होते. परंतु मोदी महाराष्ट्राबद्दल काय बोलले हे एकूण फार दुख झाले. ज्या महाराष्ट्राने भाजप युतीसोबत केंद्राला १८  खासदार दिले, त्यांच्या मागे महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या सर्वांचा नरेंद्र मोदींनी मोठा अपमान केला आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी महाराष्ट्राला कितीही बदनाम करण्याचे ठरविले तरी महाराष्ट्र दिल्लीसामोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या. केंद्र सरकार आणि मोदी सतत मुंबईचे महत्व कमी करू पहात आहेत. असे ते का करत आहेत असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!