Share

“मला त्यांनी दोन तीनदा संघात येण्याचे निमंत्रण दिले..” ; विराट कोहलीचा गौप्यस्फोट

Published On: 

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने मेगा ऑक्शन आधी आपल्या खेळाडूंसोबत पॉडकास्ट रेकॉर्ड केले आहे. ज्यात एबी डिव्हिलियर्स , युझवेंद्र चहल आणि विराट कोहली यांनी आरसीबी सोबतच्या प्रवासाबाबत सांगितले आहे. ज्यात विराट कोहली याने मोठे खुलासे केले आहेत.

विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा भाग आहे. त्याने १४ हंगाम त्यांच्यासोबतच खेळले आहेत. त्याने पॉडकास्ट मध्ये बोलताना इतर संघानी या काळात त्याला आरसीबी सोडत त्यांच्या संघात सामील होण्याचा प्रस्ताव दिल्याचे तो म्हणाला आहे. “माझ्याशी काही वेळा संपर्क साधला गेला आहे तसेच ऑक्शनमध्ये येण्यासाठीही सांगितले गेले. मी याबाबत विचारही केला होता.”

विराटने यावेळी तो आरसीबीसोबत इतके वर्ष खेळत असल्याने संघ न सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले आहे. “आरसीबी सोबतची निष्ठा आहे.या फ्रँचायझीने मला पहिल्या तीन वर्षांत खूप काही दिले आणि माझ्यावर विश्वास ठेवला, ही सर्वात खास गोष्ट आहे. अनेक संघांना संधी मिळाली. मात्र त्यांनी मला पाठिंबा दिला नाही तसेच विश्वास ठेवला नाही.” विराट कोहली १४ हंगाम एकाच संघासोबत खेळणारा पाहिला क्रिकेटर ठरला आहे. त्याच्या कर्णधारपदात संघाला एकही विजेतेपद न जिंकता आल्याने त्याने २०२१ मध्ये ९ वर्षे नेतृत्व केल्यानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते. आता तो केवळ फलंदाज म्हणून खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!