Share

राज्यसभेत नरेंद्र मोदींकडून शरद पवारांचे कौतुक! म्हणाले, “निराशेने ग्रासलेल्या…”

Published On: 

नवी दिल्ली: राज्यसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. त्यात काल पासून अनेक दिग्गज खासदारांनी भाषण केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे.

आपल्या भाषणात बोलताना त्यांनी शरद पवार यांचे कौतुक करत त्यांच्याकडून खूप काही शिकण्याचे आहे असे म्हंटले. त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करत त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे आणि काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी शिकले पाहीजे असे म्हंटले. कोरोना काळात पवारांनी दौरे केले, आदर्श घ्यायचा झाला तर शरद पवारांचा घ्या असे मोदी म्हणाले. तसेच शरद पवार अनेक क्षेत्रातील लोकांना प्रेरणा देतात. निराशेने ग्रासलेल्या काँग्रेस पक्षाने त्यांचा आदर्श घ्यावा.

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भाषणात  यावेळी काँग्रेस आणि विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच लोकसभेत गदारोळ घालणाऱ्या सर्वच विरोधी पक्षांना सुनावले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!