Share

‘कॉंग्रेसच्या काळात लता मंगेशकरांचा अपमान’; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Published On: 

नवी दिल्ली: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. त्यात काल पासून अनेक दिग्गज खासदारांनी भाषण केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे.

आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसला माय लेकाचा पक्ष म्हणून नामांतर करा असे सूचित केले. तसेच त्यांनी काँग्रेसने देशात कोरोना पसरवला आहे असा आरोप केला. काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे देशाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. काँग्रेसची बऱ्याच राज्यात अजून एकदाही सत्ता आली नाही. आमचा एखादा पराभव झाला तर आम्ही अनेक महीने त्यावर चिंतन करतो, परंतु काँग्रेस एवढ्या वेळा हरून सुद्धा त्यांचा अहंकार जात नाही, असे मोदी म्हणाले.

या वेळी बोलताना त्यांनी लता मंगेशकर यांचे बंधु पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा कॉंग्रेसने अपमान केला असल्याचा देखील खळबळजनक आरोप केला आहे. जेव्हा हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांची कविता आकाशवणीत सादर केली होती, तेव्हा त्यांना अपमानित करून आकाशवणीतून काढून टाकण्यात आले होते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!