Share

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द ?

Published On: 

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आणि अँटिलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणातील संशयित आणि जवळपास पाच वसुलीच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेली परमबीर सिंह (Parambir Singh) यांचं निलंबन रद्द होऊ शकतं असं बोललं जात आहे.

परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर ते काही दिवस ड्यूटीवर गैरहजर होते. महाराष्ट्र सरकारनं त्यांना डिसेंबर २०२१ मध्ये ऑल इंडिया सर्विसेस रुल्स अॅक्ट १९६९ अंतर्गत निलंबित केलं होतं. परमबीर यांचं निलंबन करुन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतातील कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निलंबित केल्यानंतर त्या राज्याच्या सरकारनं चौकशी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून ६ महिन्यांत अहवाल द्यावा लागतो.

परमबीर यांचं निलंबन करुन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अशातच सरकारनं त्यांच्या निलंबनाचं कारण उघड करण्यासाठी अद्याप चौकशीसाठी चौकशी अधिकारी नेमलेला नाही. गृहविभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल अॅडमिस्ट्रेशन विभागानं सेवानिवृत्त ब्युरोक्रेटची यादी चौकशीसाठी गृह विभागाकडे पाठवली होती, मात्र गृह विभागानं तो प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच जर सरकारनं चौकशी अधिकारी नेमून निलंबनाच्या कारणाचा अहवाल तयार केला नाही, तर त्यांना सिंह यांचं निलंबन मागे घ्यावं लागू शकतं, असं सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!