मुंबई: मागील काही दिवसांपासून कोरोना पुन्हा फास आवळताना दिसतोय. देशासह राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाल आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्याची चर्चा आहे. तरी सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या वाढत्या रुग्ण संख्याबघून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू शकतो. अशी आशंका वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईच्या नाईट क्लबमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाही, त्यामुळे सर्वात आधी नाईट क्लब बंद होण्याची शक्यता असल्याचे , संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने काही नाईट क्लबवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु यामुळे काही फरक पडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नाईट क्लब पहिले बंद करणार असल्याचा संकेत अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिला. तसेच मास्क न वापरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जाण्याची व गर्दी सारखे ठिकाणं बंद करण्याचा निर्णय देखील घेण्याची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर काल कोरोना आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असता कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहेत. ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्या भागात अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी आणि काही निर्बंध लावण्यात येणार आहेत. तसे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. परंतु जर कोरोना नियमांचे असेच उल्लंघन करत राहिल्यास आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिल्यास मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत


