मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता, या प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे आज विधानसभेत पुन्हा एकदा पडसाद उमटले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी समाधानकारक उत्तर दिले नसून भाजप नेत्यांनी सर्व पुरावे समोर असताना सचिन वाझेंना का पाठीशी घातलं जातंय ? असा सवाल करत सभागृह घोषणांनी दणाणून सोडले. तर, अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोट मध्ये भाजप नेत्याचे नाव असल्याचा मुद्दा समोर आणला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली होती.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दोषी कोणत्याही पक्षाचा असो त्याला शिक्षा झाला पाहिजे. मात्र, हिरेन यांच्या गूढ मृत्यूशी संबंध असलेल्या सचिन वाझे यांना पाठीशी घातलं जातंय. त्यांना निलंबित करून अटक करण्यात यावी अशी मागणी फडणवीसांनी केली. यानंतर, भाजप आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणा देखील दिल्या.
मनसुख हिरेन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप !
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला. माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती, असं हिरेन यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल करतानाच हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

