Share

बायकोच्या प्रत्येक दुखापतीसाठी नवराच जबाबदार-सुप्रीम कोर्ट

Published On: 

नवी दिल्ली : देशातील विवाहानंतरच्या प्रचलित प्रथांवर सुप्रिम कोर्टाने अतिशय महत्त्वाची नोंद केली आहे. विवाहानंतर पत्नी पतीच्या घरी राहायला जाते. परंतु, सासरी एखाद्या महिलेला कुटुंबीयांकडून मारहाण झाली तर तिच्या जखमांसाठी मुख्यत: तिचा पतीच जबाबदार असेल, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. यावेळी एका प्रकरणात पत्नीला मारहाणीचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली त्याचा हा तिसरा विवाह होता तर संबंधित महिलेचे दुसरे लग्न होते.

२०२० साली जून महिन्यात एका महिलेने लुधियाना पोलिसांत पती आणि सासरच्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्याने पती, सासरे आणि सासू यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप पीडितेने केला होता. या प्रकरणी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने आरोपी पतीचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. सर्वोच्च न्यायालयात आरोपीच्या वकिलाने अटकपूर्व जामीन देण्याची मागणी केली.

तेव्हा सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आरोपी पतीला खडेबोल सुनावले. ‘तुम्ही कशा पद्धतीचे पुरुष आहात? पत्नीच्या आरोपानुसार गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तसंच जबरदस्तीनं गर्भपात करण्यात आला. पत्नीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करणारे तुम्ही पुरुष आहात’ असे खंडपीठानं म्हटले.

यावेळी वकिलाने ‘आरोपीनं नाही तर त्यांच्या वडिलांनी महिलेला मारहाण केली होती’ असे सांगितले. यावेळी कोर्टाने सुनावले की, ‘यामुळे कोणताही फरक पडत नाही की कथितरित्या मारहाण करणारा पती होता की पिता. जेव्हा एखाद्या महिलेचा सासरच्या घरी छळ होतो तेव्हा मुख्य रुपात ही जबाबदारी पतीची आहे’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली. शिवाय आरोपी पतीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!