Share

लस न घेतलेल्यांना लोकल प्रवास नाहीच, आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

Published On: 

मुंबई: दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. यानंतर मुंबईकरांतून मोठा उत्साह पहावयास मिळाला. मात्र कोरोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवास करूच दिला जाणार नसल्याचे मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान येत्या १५ ऑगस्टपासून लोकल सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. मात्र, ही सुविधा फक्त दोन डोस घेतलेल्यांसाठी आणि त्याला १४ दिवस पूर्ण झाले असलेल्यांसाठीच उपलब्ध असेल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीचे पास मिळतील. अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल, रेस्टॉरंटमध्येही प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. लसीकरण सर्टिफिकेटवरील नंबरच्या आधारे ऑनलाईन पासची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी वॉर्ड ऑफिसमध्येही ऑफलाईन पद्धतीने पास मिळतील. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!