Share

वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवार नाचवली,अबू आझमींसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते आमदारअबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुंबईतील शिवाजी नगर गोवंडी भागात कार्यकर्त्यांनी ही मिरवणूक काढली. समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेल्या या मिरवणुकीत अबू आझमी यांनी हातात तलवार नाचवल्याचंही पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने टीकेची झोड उठली आहे.

काल मुंबईच्या शिवाजी नगर गोवंडी विभागाचे आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली.या शेकडोच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते. यावेळी फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

विशेष म्हणजे यावेळी अबू आझमी यांनी हातात तलवार घेऊन तिचे प्रदर्शन देखील केले. यावेळी पोलीस मात्र बघाच्या भूमिकेत दिसून आले. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. अबू आझमी  यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर मुंबईत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तलवारीने केक कापणे आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!